महाराष्ट्रशिक्षणसाहित्य-कला-संस्कृती
उरणची सुकन्या मुग्धा उभारे ज्युनियर रायझिंग स्टार स्पर्धेत प्रथम

- महिंद्रा हॉलिडे आणि रिसॉर्ट इंडिया लिमिटेडकडून स्पर्धेचे आयोजन
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : तालुक्यातील बोरी गावची सुपुत्री मुग्धा प्रसाद उभारे या अवघ्या ७ वर्षीय चिमुरडीने महिंद्रा ज्युनियर रायझिंग स्टार २०२४ डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महिंद्रा हॉलिडे आणि रिसॉर्ट इंडिया लिमिटेडतर्फे घेण्यात आलेल्या महिंद्रा ज्युनिअर रायझिंग स्टार २०२४ डान्स स्पर्धा दि. ७ डिसेंबर रोजी मुबंई येथील महिंद्रा टॉवर्स स्पर्धेत उरण तालुक्यातील बोरी गावची सुकन्या मुग्धा प्रसाद उभारे या अवघ्या ७ वर्षीय चिमुरडीने प्रथम क्रमांक मिळविला आहे.