उरणमध्ये गणेशोत्सवात साकारलेल्या जेजुरीच्या देखाव्याने वेधले भाविकांचे लक्ष!
- वादन एक कलाचा राजा या संघटनेचा उपक्रम
उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वादन एक कलाचा राजा या सामाजिक संघटनेतर्फे साखर चौथीचा गणपती कामगार वसाहत ( वाडी) उरण शहर, कामठा रोड येथे विराजमान झाला आहे.दरवर्षी येथे गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. याही वर्षी वादन एक कलाचा राजा या संघटनेतर्फे कामगार वसाहत वाडी उरण शहर येथे भव्य दिव्य असे जेजुरीच्या खंडेरायाचे प्रतिकृती गणेशोत्सव निमित्त साकारण्यात आला. या देखाव्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
येथील गणेशमूर्तीचे दर्शन घेतल्यावर साक्षात जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्याचा अनुभव भाविक भक्तांना येत आहे. मूर्तिकार साई ठाकूर यांनी गणपतीची सुबक व आकर्षक मूर्ती बनवली असून भाविक भक्तांचे ती लक्ष वेधून घेत आहे. जेजुरीचे प्रतिकृती बघण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यंदाचे गणेशोत्सव साजरे करण्याचे चौथे वर्ष आहे. यंदाचा उत्सव शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ दरम्यान आहे.
या दरम्यान संघटनेच्या वतीने विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक ओमकार घरत, अध्यक्ष तेजस म्हात्रे, उपाध्यक्ष मयूर केकातपुरे व वादन एक कलाचा राजा या संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.