उरणमध्ये नवीन शेवा येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/06/img-20240620-wa00367306031337429454339-780x470.jpg)
उरण दि २० (विठ्ठल ममताबादे ) : गुरुवार दिनाकं २० जून २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळयानिमित्त माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते उरण तालुक्यातील नवीन शेवा गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक येथे मूर्तीवर अभिषेक करुन राज्याभिषेक सोहळ साजरा करण्यात आला.
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/06/img-20240620-wa00367306031337429454339-1024x768.jpg)
यानिमित्ताने नवीन शेवा गावातील शिवराय युवा मंडळातील सदस्य यांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५० गड-किल्यांना भेटी दिल्याबद्दल नवीन शेवा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील शिक्षकांना माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते छत्री वाटप करण्यात आले.
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/06/img-20240620-wa00321866550406542688447-1024x768.jpg)
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच सोनल घरत, उद्योगपती किसनशेठ म्हात्रे, ग्रा. प. सदस्य सतिश सुतार, शिवभक्त पंकज सुतार, नीलेश घरत, पंढरीनाथ घरत, हेमंत म्हात्रे, दर्शन घरत, नितीन घरत, रंजित घरत, रोशन भोईर, रुपेश म्हात्रे उपस्थित होते.