कोकणीतील नमन, जाखडी कलांचे जतन होण्यासाठी कलाकारांना मानधन मिळावे
चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या लक्षवेधी मागणीवर शासन सकारात्मक
देवरूख (सुरेश सप्रे) : मध्य कोकणातील लोक खेळे (नमन) जाखडी नाच या कलाप्रकाराच्या माध्यमातून अनेकांना मनोरंजन व प्रबोधन करण्याचे काम करत असतात. पारंपरिक कलांना शासनाच्या सांस्कृतिक कला अनुदान आणि कलाकार योजनांतर्गत अनुदान मिळते. तसेच अनुदान सध्याच्या शासन निर्णयामध्ये नमन -खेळे व जाखडी यासाठी देण्याची तरतूद करणेची मागणी आ. निकम यांनी केली.
या अभिजात कोकणी कलाप्रकार महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामधे लोककला सांस्कृतिक पारंपारीक कला जतन करण्यासाठी राज्यातील कलापथक. लावणी कलापथक. तमाशा फड. दशावतार आदी पारंपरिक कलांना शासनाच्या सांस्कृतिक कला अनुदान आणि कलाकार योजनांतर्गत अनुदान मिळते. तसेच अनूदान सध्याच्या शासन निर्णयामध्ये नमन / खेळे व जाखडी यासाठी अनुदान देण्याची तरतूद नसल्यामुळे ह्या प्रकारचे अनुदान नमन/खेळे व जाखडी या कलाप्रकारांना देता येणे शक्य होत नाही ही वस्तुस्थिती असल्याचे आम.शेखर निकम यांनी महाराष्ट्र विधानमंडळ अर्थसंकल्पिय अधिवेशनात महाराष्ट्र विधान सभा सूचना क्र. १३३३दिलेल्या लक्षवेधी सुचनानुसार” शासनाने दखल घेत खेळे / नमन. जाखडी नाच या कलाप्रकाराच्या माध्यमातून अनेकजण मनोरंजन व प्रबोधन करण्याचे काम करतात वस्तुस्थिती आहे. तथापि, नमन /खेळे व जाखडी या कलाप्रकारांना अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. यासाठी या लोककला प्रकारांचे इत्यंभूत सर्वेक्षण करून त्याची माहिती जमा करुन तज्ञ समितीच्या मार्फत आवश्यकतेनुसार याबाबतची कार्यपद्धती व इष्टांक ठरविण्यात येईल, असे लेखी उत्तर मिळाल्याने नमन / खेळे व जाखडी नाच या प्रकारातील लोककलाकारांना राज्यात राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत राज्यातील संघटित किंवा असंघटित प्रयोगात्नक लोककलेतील कोणत्याही पात्र कलाकारास मानधन मिळू शकते.
राज्यामध्ये सध्या विविध कला प्रकारातील अनेक कलाकारांना दरमहा समितीने नियत केलेल्या श्रेणीनुसार मानधन देण्यात येते. जाखडी व नमन /खेळे या प्रकारातील सदर योजनेचे निकष पूर्ण करणारे व निवड समितीने निवडलेले कलाकारही या योजनेसाठी पात्र ठरतील. यामुळे नमन व जाखडी कला व कलावंत यांना आ. निकमांच्या पाठपुराव्याने मानधन मिळण्याची आशा निर्माण झाल्याने सर्व कलावंत मंडळी आम. निकम यांना धन्यवाद देत आहे.