महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
कोकण नगर येथे आज ईद-ए-मिलादनिमित्त मुलांच्या रॅलीचे आयोजन

रत्नागिरी : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद ए मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो. ईद-ए-मिलाद चे औचित्य साधून आज रविवारी कोकण नगर मदरसा फैजाने अत्तार येथून कोकण नगर परिसरात लहान मुलांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली रत्नागिरी शहरातील कोकण नगर मदरसा फैजान अत्तार येथून रविवारी संध्याकाळी सात वाजता रॅलीला सुरुवात होईल यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आले आहे.