ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वे मार्गावर १८ एप्रिल रोजी ३ तासांचा ‘मेगाब्लॉक’
दोन विशेष गाड्यांवर होणार मेगाब्लॉकचा परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांवर होणार आहे.
मागील काही महिन्यांपासून कोकण रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेकडून पूर्वनियोजित मेगा ब्लॉक घेतला जात आहे. हे सत्र अजूनही सुरूच आहे.
कोकण रेल्वे नव्याने दिलेल्या माहितीनुसार मडगाव ते कुमटा या सेक्शन दरम्यान दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी दुपारी बारा वाजून दहा मिनिटे ते सायंकाळी तीन वाजेपर्यंत असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
या विशेष गाडीच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
कोकण रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या या मेगाब्लॉकमुळे गाडी क्रमांक 06602 मंगळूर सेंट्रल ते मडगाव जिचा प्रवास दिनांक 18 एप्रिल रोजी सुरू होतो ती गाडी मडगाव पर्यंत न नेता कारवार पर्यंत नेऊन परतीच्या प्रवासात तिथूनच (06601) परत कारवार येथूनच मंगळूरूपर्यंत चालवली जाणार आहे. कारवार ते मडगाव पर्यंतचा या गाडीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.