गणपतीपुळे येथील मंदिरात द्राक्षांची आरास!

रत्नागिरी : रामनवमीचे औचित्य साधून गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात रविवारी द्राक्षांची आरास करण्यात आली. असंख्य भाविकांनी यावेळी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.संस्थान श्री गणपतीपुळे येथील मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी रामनवमीचे औचित्य साधून मंदिरात स्वयंभू श्रींच्या पुढे द्राक्षांची आरास करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
संस्थान श्री गणपतीपुळे येथील मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी रामनवमीचे औचित्य साधून मंदिरात स्वयंभू श्रींच्या पुढे द्राक्षांची आरास करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
या आधी देखील मंदिरात 21 डझन हापूस आंब्याची तसेच विलायती काजूची आरास करण्यात आली होती.
रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर स्थानिक तसेच दूरवरून आलेल्या भाविकांनी दर्शन रांगांमध्ये श्री गणेशाचे दर्शन घेतले.