गव्हाण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गोकुळाष्टमी धूम धडाक्यात साजरी

उरण दि.७ (विठ्ठल ममताबादे ) : यमुना सामाजिक – शैक्षणिक संस्था शेलघर संस्थेमार्फत गोरगरीब व गरजू पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी गव्हाण येथे सुसज्य अशी न्यू इंग्लिश स्कूल गव्हाण शाळा चालविली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी सर्व पारंपारिक सण शाळेतर्फे साजरे केले जातात. गोकुळअष्टमी सण धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.
बाळगोपाळांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक महेंद्रशेठ घरत, एक्झिक्युटीव्ह मेंबर वसंत म्हात्रे, चेअरमन – के.डी. कोळी, कमिटी मेंबर नंदकुमार कोळी, चंद्रकांत घरत, कल्पना म्हात्रे, सचिन घरत, प्रकाश देशमुख, हेमंत पाटील, शाळेच्या मुख्याध्यपिका सपना लाड तसेच शिक्षक वृंद व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.