महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
रत्नागिरीची गार्गी बंडबे कविता लेखन स्पर्धेत देशात चौथी
रत्नागिरी, दि. २१ : पोद्दार कॉन्टेस्ट तर्फे २०२४ मध्ये कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आयोजकांकडून जाहीर झाला असून, रत्नागिरी येथील पोद्दार इंटर नॅशनल स्कूलची कु. गार्गी राजेंद्र बंडबे ही इयत्ता 9 वी मध्ये शिकणारी विद्यार्थीनी संपूर्ण भारतात चौथी आली आहे. या स्पर्धेसाठी पुर्ण भारतातून सुमारे 300 कवी विद्यार्थीनी यांनी यात सहभाग घेतला होता.
गार्गीच्या या यशाबद्दल रत्नागिरी आणि दापोली परिसरातून कौतुक होत आहे.