गुहागरमधील किरण कला मंडळाच्या अध्यक्षपदी वसंत धनावडे
गुहागर : सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुहागर खालचापाट येथील किरण कला मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. वसंत पांडुरंग धनावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी श्री. सुभाष गणपत घाडे यांची निवड केली गेली.
येथील कमलाकर सभागृहात किरण कला मंडळ स्थानिक व मुंबई मंडळाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. सेक्रेटरी पदी अनिल रेवाळे, खजिनदार पदी अमरदीप जाधव यांची निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारिणी मंडळाच्या पुढील बैठकीत करण्यात येणार आहे.
यावेळी स्थानिक मंडळाचे माजी अध्यक्ष उदय लोखंडे, मुंबई मंडळ खजिनदार विश्वास जोशी, किरण लोखंडे,
मारुती घाडे, रवींद्र घाडे, संदीप कापडे, सुहास जोशी, चंद्रशेखर लोखंडे, श्रीधर कुळे, चंद्रकांत रेवाळे, मंगेश कुळे, राजेश बेंडल, प्रवीण घाडे, सुधीर धनावडे, अंकित धनावडे, उमेश कुळे, विजय जाधव, महेंद्र बेंडल, रुपेश रेवाळे, सागर धनावडे, सुहास धनावडे, सुरेश कुळे, अथर्व लोखंडे, स्वरूप कापडे, दीपक धनावडे, आयुष बेंडल, विजय लोखंडे, आदीसह मंडळाचे सभासद उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. धनावडे यांनी मंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असून येत्या काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.