महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृतीस्पोर्ट्सहेल्थ कॉर्नर

दापोलीत ११-१२ मे रोजी दापोली समर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे ११ व १२ मे २०२५ रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉन २०२५, सिझन ७ स्पर्धेचे आयोजन सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.

यामध्ये ७० वा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी सायकल राईड करत साजरा करणाऱ्या पुणे येथील ७८ वर्षीय डॉ निरुपमा भावे सहभागी होणार आहेत. त्यांनी ७२ व्या वर्षी पुणे ते जम्मू, ७५ व्या वर्षी पुणे ते कोलकाता, पंढरपूर ते घुमान पंजाब असे देशभर अनेक सायकल प्रवास केले आहेत. आदी कैलास, ओम पर्वत मार्गावर सायकलिंग, नुकतीच श्रीनगर ते मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग करत जागतिक विक्रम प्रस्तापित करणारे सतीश जाधव (वय ६८), अनेक लांब अंतराच्या मॅरेथॉन, राईड करत असणारे ७७ वर्षीय जुगल राठी, नुकतीच दिल्ली- कोलकाता- पुणे राईड केलेले ७९ वर्षीय गौतम भिंगानिया, जगातील सर्वात उंच उमलिंगला पास सायकल चालवत सर करणारे डॉ सुभाष कोकणे (वय ७३), जयश्री जाधव(वय ६२), राजू औटी (वय ६१), विजय हिंगे (वय ६५), अरुण नेवसे (वय ६४), हेमलता राव (वय ६६) असे सायकलिंग क्रीडाप्रकारात वय हद्दपार करणारे काही रायडर्स दापोली सायक्लोथॉन मध्ये सहभागी होऊन सायकल चालवणार आहेत. देश विदेशात सायकलिंग केलेल्या या सर्वांचे प्रेरणादायी अनुभव ऐकणे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणे नक्कीच पर्वणी असणार आहे.

ही सायकल स्पर्धा १ ते १५० किमी अंतराची असून ५० किमी कोस्टल सिनिक रुट, ४ ते १५० किमी शॉर्ट सिटी लूप, फन राईड अशा गटात होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शॉर्ट सिटी लूप मार्गावर ५०, ७५, १००, १२५, १५० किमी सायकल चालवणाऱ्या स्पर्धकांना प्रत्येकी २००, ३००, ४००, ५००, ६०० रोख रक्कम बक्षिस असेल. शिवाय इतर काही खास बक्षिसे पण असतील. १२ तासात १५० किमी अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असेल. ५० किमी कोस्टल सिनिक रुट सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली ते आसूद, सालदुरे, पाळंदे, बायपास रोड, आंजर्ले पूल, अडखळ, पाजपंढरी, हर्णै, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो, मेडिकल मदत असेल. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७, ९०२८७४१५९५ हे आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button