दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडमध्ये पारंपरिक वाद्यवादन कार्यक्रमासाठी लांजातील तिघांची निवड
लांजा : दिल्ली येथे २६ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारताच्या विविध भागांतील 100 हून अधिक महिलांच्या पारंपरिक वाद्य वादनाने सुरूवात होणार आहे. सुमारे १५०० महिला नर्तकींचा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर होणार आहे. या कार्यक्रमात लांजातील शिवगंध प्रतिष्ठानचे कलाकार ढोलवादक अंकिता जाधव, अनुष्का जाधव, आदित्य कांबळे यांची निवड झाली आहे.
डॉ. संध्या पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली, SNA चे अध्यक्ष आणि देवेंद्र शेलार आणि टीमचे नृत्य दिग्दर्शन आहे. महिला वादकांच्या टीममध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 24 मुल आहेत. त्यामध्ये शिवगंध प्रतिष्ठान ढोल ताशा पथकातील 2 मुली व 1 मुलगा आहे. लांजावासियांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. तसेच रत्नागिरी,
लांजा, राजापूर आणि चिपळूण येथील कलाकार पूढीलप्रमाणे आहेत – साहिल श्रीकांत रानडे, चिपळूण. आदित्य दिलीप कांबळे, लांजा, वेदांत विजय पवार,चिपळूण. भावेश जयंत चिंगळे, चिपळूण, प्रणाली नारायण पंडव, चिपळूण, प्रियांका पांडुरंग शिगवण,चिपळूण. आदिती सुनिल कुर्ले, राजापूर. पूजा सुनिल कुर्ले,राजापूर अंकिता अविनाश जाधव,लांजा अनुष्का अविनाश जाधव, लांजा धनश्री विवेक फिरमे,खानापूर. गौरी नितीन जोशी, पुणे, नुपूर दत्ताराम कीर, रत्नागिरी.
साक्षी दिनेश घाडगे, चिपळूण, अंकिता संतोष डिंगणकर, चिपळूण, ज्ञानेश्वरी जनार्दन हुमणे, चिपळूण, सिद्धी सदानंद बोलाडे, चिपळूण, साक्षी सूर्यकांत पवार, चिपळूण, दीक्षा संदीप सुतार, चिपळूण, पूनम संतोष घोरपडे, चिपळूण. रोशनी सुनील घोरपडे, चिपळूण, मृण्मयी मंदार ओक, चिपळूण, प्रणोत्ती ब्रुहस्पती महाकाळ, खेड, सानिका मनोज लोटेकर, चिपळूण.
26 जानेवारी 2024 रोजी दूरदर्शनवर सकाळी 10 ते 12 या वेळेत थेट प्रक्षेपण पाहता येईल