देवरुखमधील श्री गणेश वेदपाठ शाळेत उद्या ‘स्वर संध्या’ गायन कार्यक्रम
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250131-WA0011-780x470.jpg)
देवरुख : श्री गणेश वेद पाठशाळा, देवरुख येथे शके १९४६ माघ शुक्लपक्ष चतुर्थी शनिवार दिनांक १ फेब्रुवारी, २०२५ रोजी गणेश जयंतीनिमित्त श्री.कुणाल भिडे (संगीत अलंकार) देवरुख यांचा अभंग व नाट्यगीतांचा “स्वर संध्या” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा बहारदार संगीतमय कार्यक्रम सायं. ६ ते ८ या वेळेत आयोजित केला आहे.
या संगीतमय कार्यक्रमाला तबला साथ निखिल रानडे, संवादिनी चैतन्य पटवर्धन, पखवाज मंगेश चव्हाण, तालवाद्य अद्वैत मोरे यांची संगीत साथ लागणार आहे. ‘स्वर संध्या’ या कार्यक्रमाचे निवेदन निबंध कानिटकर करणार आहेत.
या संगीतमय कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर संयोजकांच्यावतीने खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रसिक व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, विश्वस्त मंडळ श्री गणेश वेदपाठ शाळा, देवरुख यांनी केले आहे.