देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईनमध्ये रविवारी कला प्रदर्शन

- रंगसंगतीवर आधारित १८ वे वार्षिक कला प्रदर्शन
- रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वा. उदघाटन
देवरुख : देवरुख येथील देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन मध्ये १६ फेब्रुवारी २०२५ रोजी ” रंगसंगती ” या संकल्पनेनुसार वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन सायंकाळी चार वाजता संपन्न होणार आहे. या प्रदर्शनाचा कलारसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य रणजीत मराठे यांनी केले आहे.
या प्रदर्शनानिमित्त रूपेश पाटील (प्रसिद्ध कलाकार, उरण, नवी मुंबई), प्रफुल्ल सातोकर (सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथील प्राध्यापक आणि प्रख्यात कलाकार), संतोष पेडणेकर (सहाय्यक संचालक, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, मुंबई), अजय पित्रे ,भारती पित्रे (अध्यक्ष, पित्रे फाउंडेशन) रणजीत मराठे प्राचार्य, जितेंद्र पराडकर (प्रख्यात कलाकार आणि कला शिक्षक, संगमेश्वर) विष्णू परीट (प्रख्यात कलाकार, सोनवडे देवरुख) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी डीकॅड पुरस्कृत ‘कला गौरव पुरस्कार २०२५’ जितेंद्र पराडकर कलाशिक्षक पैसा पण इंग्लिश स्कूल संगमेश्वर यांना, तसेच कला संचालनालय, महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘राज्य कला पुरस्कार २०२५’ प्राप्त चित्रकार विष्णू परीट यांना देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन यांच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे. वार्षिक स्नेह संमेलन रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० वा. दरम्यान संपन्न होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना कला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईनचे प्राचार्य रणजीत मराठे यांनी केले आहे.