मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया रत्नागिरीतर्फे लेप्रसी कॉलनीत अन्नधान्य वाटप
रत्नागिरी : दरवर्षी ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि जिल्हा डिजिटल मीडियाच्या वतीने कुष्ठरुग्ण वसाहतीत सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पत्रकार दिनी हा सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल वसाहतीतील रहिवाशांकडून आभार मानण्यात आले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद दरवर्षी सामाजिक उपक्रम हाती घेते, या दिवशी स्वतःसाठी काही न करता समाजातील वंचित, दुर्बल घटकांसाठी नेहमी मदतीचा हात देत असते, यावर्षी कुष्ठरुग्ण वसाहतीत जीवनावश्यक किराणा सामान किट मदत म्हणून देण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष जान्हवी पाटील, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंत तापेकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान,तालुकाध्यक्ष प्रशांत पवार, सचिव व प्रसिद्धीप्रमुख जमीर खलफे, सतीश पालकर, भालचंद्र नाचणकर, रहीम दलाल इत्यादी पत्रकार उपस्थित होते.