महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

पाचल पंचक्रोशी धनगर समाजातर्फे पारंपरिक जिल्हास्तरीय गजानृत्य स्पर्धा उत्साहात

  • जिल्हाभरातील नऊ संघांनी केले कलेचे सादरीकरण


राजापूर : दसऱ्यानिमित्त दि. रविवारी १४ ऑक्टोबर रोजी धनगर समाजाचे पारंपरिक गजानृत्य स्पर्धा पाचल येथे प्रभावती हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडल्या. जिल्ह्यातून या स्पर्धेत ९ संघांनी आपली आपली लोककला ७०० रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर करून उपस्थितांची मने जिंकली त्यात प्रथम क्रमांक अंबाई मिळंद या संघाने पटकावला तर दुसरा क्रमांक यंगस्टार ओझर या संघाने पटकावला तसेच तिसरा क्रमांक लक्ष्मीमाता करक या संघाने पटकावला.

गजानृत्य स्पर्धेत सहभागी झालेले धनगर समाजबांधव.

कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावून धनगर समजाच्या या कार्यक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाचल येथे धनगर समाजासाठी समाजमंदिर या मागणीला जोर धरु लागला आहे. यावेळी काही आलेल्या राजकीय पक्षाच्या सर्वच नेत्यांनी लवकरात लवकर समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करुण देण्याचे आश्वासन दिलेले आहे.

गजानृत्य स्पर्धेला उपस्थित रसिक

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व समाज बांधव, कार्यक्रमास अमूल्य मदत करून हातभार लावला आणि सर्वच नेत्यांचे, प्रतिष्ठित व्यक्तींचे आभार मानले आणि येणाऱ्या काळात  धनगर समाजाची वज्रमूठ अशीच कायम ठेवण्याचे आश्वासनं समाजाच्या कार्यकर्त्यांनी जमलेल्या रसिक प्रेक्षकांना दिले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button