महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
पालकमंत्री उदय सामंत त्यांनी घेतला ‘संगमेश्वरी बाज’ कार्यक्रमाचा आनंद!

रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी श्रीराम नवमीचे औचित्य साधून संगमेश्वरमध्ये संगमेश्वर तालुक्याचा सांस्कृतिक कला वारसा असलेल्या “संगमेश्वरी बाज’ या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

श्रीराम नवमी निमित्त पालकमंत्री उदय सामंत यांनी मानसकोंड, संगमेश्वर येथील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी कोकणची समृद्ध कला परंपरा जपणारा “कोकणचा साज, संगमेश्वरी बाज” या विशेष कार्यक्रमाचाना. सामंत यांनी मनमुराद आनंद घेतला. पारंपरिक वाद्यांची साथ आणि कलाकारांचा बहारदार जलवा, मनामध्ये भक्तीभाव अधिकच वृद्धिंगत करणारा ठरला.