फाटक हायस्कूलमध्ये शारदोत्सवाचा शुभारंभ

रत्नागिरी : फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला वाणिज्य आणि कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शारदोत्सवाचा शुभारंभ झाला.

दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे यांच्याहस्ते शारदादेवीची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, संस्था सचिव दिलीप भातडे, संस्था पदाधिकारी, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिनेश नाचणकर आणि शिक्षकांच्या उपस्थितीत ढोल – ताशांच्या गजरात देवीच्या आगमनाची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक कीर यांनी नऊ दिवस चालणाऱ्या शारदोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी देवीच्या गोंधळाचे सादरीकरण केले. तपस्या बोरकरने आदिशक्तीच्या विविध रूपांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. जागर स्त्रीशक्तीचा उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारी व्याख्याने, मुलाखती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या भजनांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. ‘अनाथांची माय सिंधुताई सपकाळ’ यांच्या कार्याचा परिचय तीर्था कीर यांनी करून दिला.