भारतीय रेल्वेला ‘सुवर्णकाळ’ आणण्यामागे कर्मचाऱ्यांची मोठी ताकद : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
दिल्लीतील भारत मंडपममध्ये रेल्वेचा अति उत्कृष्ट सेवा पुरस्कार 2023 चा दिमाखदार वितरण सोहळा!
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचा सध्या गोल्डन पिरियड अर्थात सुवर्णकाळ सुरू आहे. रेल्वेला हा सुवर्णकाळ आणण्यात कर्मचाऱ्यांची मोठी ताकद असल्याचे तसेच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय रेल्वेच्या सुवर्णकाळाबाबत वेळोवेळी उल्लेख केल्याचे गौरवोदगार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काढले.
केंद्रीय रेल्वे वाहतूक आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री, श्री अश्विनी वैष्णव यांनी दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी ६८व्या केंद्रीय रेल्वे सप्ताह सोहळ्यात रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सर्वोत्तम कार्यपद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले.
‘अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार-२०२३’ भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
विभागीय रेल्वे/पीएसयूंना विशिष्ट क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी शिल्ड प्रदान करण्यात आली. रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील आणि रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री, श्रीमती दर्शना जरदोश या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या; यावेळी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्य़कारी अधिकारी आणि सदस्य, सर्व विभागीय रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि रेल्वेच्या उत्पादन युनिटचे प्रमुख आणि रेल्वेचे सार्वजनिक उपक्रम अधिकारी उपस्थित होते.
देशभरातील एकूण विविध विभागीय रेल्वे, उत्पादन युनिट आणि रेल्वे सार्वजनिक उपक्रम (PSUs) मधील १०० रेल्वे कर्मचारी (५० अधिकारी आणि ५० कर्मचारी) यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवांसाठी २१ शिल्डसह सन्मानित करण्यात आले. दि. १६.०४.१८५३ रोजी भारतातील पहिली ट्रेन धावल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा केला जातो. रेल्वे सप्ताहादरम्यान, संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात.
वर्ष २०२३ साठी, ७ मध्य रेल्वे अधिकार्यांच्या (३ अधिकारी आणि ४ कर्मचारी) सेवांना प्रतिष्ठित सन्मान देण्यात आला.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत.
१. जयप्रकाश दिवांगन, वरिष्ठ तंत्रज्ञ (वेल्डर), नागपूर विभागातील कामकाज, सुरक्षा आणि सुरक्षितता, उत्तम देखभाल आणि मालमत्तेचा वापर सुधारण्यासाठी केलेल्या अनुकरणीय कार्याच्या श्रेणीत.
२. धर्मेंद्र कुमार, प्रवासी तिकीट निरीक्षक, मुंबई विभाग, उत्पन्न वाढवण्यासाठी आणि विनातिकीट प्रवास, चोरी इत्यादींना तोंड देण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांच्या श्रेणीत.
३. सुनील डी नैनानी, प्रवाशी तिकीट निरीक्षक, मुंबई विभाग उत्पन्न वाढवण्यासाठी आणि विनातिकीट प्रवास, चोरी इत्यादींना तोंड देण्यासाठी विशेष प्रयत्नांच्या श्रेणीत.
४. संजय रामचंद्र पोळ, वरिष्ठ विभाग अभियंता (कायमस्वरूपी निरीक्षक), सोलापूर विभाग इतर कोणत्याही क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीच्या श्रेणीत.
५. विवेक एन. होके, विभागीय वरिष्ठ वित्त व्यवस्थापक, सोलापूर विभाग नवकल्पना/प्रक्रिया/प्रक्रियेच्या श्रेणीत, ज्यामुळे खर्च, उत्पादकता सुधारणे, आयात प्रतिस्थापन इ.
६. सुधांशू मित्तल, विभागीय सिग्नल आणि दूरसंचार, पुणे विभाग विक्रमी वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या श्रेणीत.
७. डॉ. शिवराज पी. मानसपुरे, वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक, भुसावळ विभाग यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी आणि विनातिकीट प्रवास, चोरी इत्यादींना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
वैयक्तिक पुरस्कारांव्यतिरिक्त विभागीय स्तरावर उत्कृष्ट विभागीय कामगिरीसाठी विविध शिल्ड देखील प्रदान करण्यात आल्या. एकूण २१ विभागीय शिल्डपैकी, मध्य रेल्वेने उत्कृष्ट कामगिरीसाठी ४ विभागीय शिल्ड प्राप्त केल्या.
ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
१) सर्वसमावेशक हेल्थ केअर शील्ड (वैद्यकीय) – प्रदान केलेल्या सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधांसाठी
- मध्य रेल्वेच्या सर्व क्षेत्रिय आणि विभागीय आरोग्य युनिट्सच्या रुग्णालयांच्या माहिती व्यवस्थापन प्रणालीचे डिजिटलीकरण.
- विभागीय रेल्वे हॉस्पिटल पुणे येथे सुसज्य ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती रूग्णालय, भायखळा, क्षेत्रिय रूग्णालय आणि विभागीय रूग्णालयामध्ये निओ नेटल आणि पेडियाट्रिक्स इंटेन्सिव्ह केअर युनिट्स (ICUs) चे अपग्रेडेशन.
- प्रगत शस्त्रक्रिया जसे की जॉइंट रिप्लेसमेंट, कॉक्लियर इम्प्लांट, स्पाइन सर्जरी इ.
२) स्टोअर शील्ड (मटेरिअल मॅनेजमेंट) – हे शिल्ड पश्चिम रेल्वेसोबत शेअर केले जाईल. भंगार विल्हेवाटीची उत्कृष्ट कामगिरी आणि ऑनलाइन खरेदीसाठी सलग दुसरी वेळ.
- “झिरो स्क्रॅप” मिशन नोव्हेंबर २०२३, अंतर्गत २४८.०७ कोटी रुपयांची प्रशंसनीय स्क्रॅप विक्री साध्य केली.
- दिलेल्या कालमर्यादेत ‘विवाद से विश्वास’ उपक्रमांतर्गत १०८३ प्रकरणे यशस्वीरीत्या निकाली काढली आणि पीडित विक्रेत्यांना योग्य परतावा देण्यात आला.
- झोनमध्ये ६३ स्टॉल्सची स्थापना करून ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ (OSOP) उपक्रमाद्वारे ‘वोकल फॉर लोकल’ व्हिजनला सक्रियपणे प्रोत्साहन दिले.
- सार्वजनिक खरेदीमध्ये कार्यक्षमता, पारदर्शकता आणि गती वाढवण्यासाठी सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) द्वारे खरेदीवर महत्त्वपूर्ण भर दिला.
- “कॅन्साइनीच्या शेवटी एचएसडी तेलांच्या थेट वितरणासाठी बाउझर सेवेचा परिचय”, आणि “विकसित विविध प्रशिक्षण मॉड्यूल्सद्वारे शिकणे हे दररोजच्या कामाचा एक भाग बनवणे” यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले.
3) कार्मिक विभाग शिल्ड – कर्मचारी कल्याणासाठी घेतलेल्या विविध ऑनलाइन उपायांसाठी
- ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम (HRMS) मॉड्युल्स जसे की ई-पास, सेटलमेंट, आणि भविष्य निर्वाह निधी (PF) मॉड्यूल्समध्ये सर्वोच्च कामगिरी.
- ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतींद्वारे १००% तक्रारींचे निराकरण केले. सर्व ३९२ CA III आणि १३१९ केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) अंतर्गत तक्रारी वेळेत निकाली काढल्या. ई-संवाद ही एक अनोखी संवाद प्रणाली सुरू करण्यात आली आहे जिथे कर्मचारी थेट आस्थापना अधिकाऱ्याशी ऑनलाइन संवाद साधू शकतात.
- वर्षभरात सुरक्षा श्रेणीमध्ये १२५६६ पदोन्नती दिल्या.
- वर्षभरात ८४५ सामान्य सेवानिवृत्ती व्यतिरिक्त (ONR) प्रकरणे वेळेत निकाली काढली.
- वर्षभरात वेळेत ६१६ अनुकंपा ग्राउंड अपॉइंटमेंट्स (CGA) दिल्या.
- मध्य रेल्वेने वर्षभरात २३५ पैकी २३५ न्यायालयीन खटले जिंकले, ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे.
- मध्य रेल्वेने ९२५०० कर्मचारी सक्षम प्रकल्पांतर्गत प्रशिक्षणासाठी पाठवले, ज्यात ९८% पुरुष आहेत.
४) पर्यावरण आणि स्वच्छता शिल्ड – सौर ऊर्जा आणि इतर ऊर्जा संवर्धन उपायांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि स्वच्छतेच्या कामगिरीसाठीची ही सलग चौथी वेळ
- १५३५ KLD स्थापित प्रक्रिया क्षमतेचे ९ जलशुद्धीकरण प्रकल्प (लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २ आणि अहमदनगर, नाशिक रोड, अकोला, खांडवा, कोपरगाव, सोलापूर आणि साईनगर शिर्डी येथे प्रत्येकी १) सुरू करणे.
- १.५३ लाख रोपे आणि ३ मियावाकी वृक्षारोपण (वाडी, सोलापूर आणि अहमदनगर स्टेशन)
- २०५ kW अक्षय ऊर्जा स्त्रोत विविध ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले आहेत.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (५), दादर (५) आणि कुर्ला, घाटकोपर आणि विक्रोळी येथे प्रत्येकी १ अश्या १७ मेघदूत मशिन बसवण्यात आल्या आहेत.
- १२ ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स (बार्शी टाउन, जिंते, पारेवाडी, वाशिंबे, पुणे (डिझेल शेड), पुणे (संगम पार्क कॉलनी), खडकी, कोल्हापूर (रिटायरिंग रूम), चिंचवड कॉलनी, भिगवण, सांगली आणि मिरज)
- मनमाड, खांडवा, बडनेरा आणि सोलापूर येथील कोचिंग कॉम्प्लेक्स मध्ये ४ कंपोस्ट प्लांट कार्यान्वित.
मध्य रेल्वेच्या वतीने महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्या हस्ते वरील ४ उत्कृष्ट विभागाचे शिल्ड स्वीकारण्यात आले. हे पुरस्कार प्रवासी सेवा आणि भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाप्रती मध्य रेल्वेचे समर्पण, वचनबद्धता आणि निष्ठेची साक्ष आहेत.