मंगळागौर स्पर्धेत असगोलीचा खिलाडी ग्रुप प्रथम
- गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ व लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा
गुहागर : गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ व लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित श्रावणातील खेळ मंगळागौरीचे या स्पर्धेत असगोलीच्या खिलाडी ग्रुपने प्रथम तर शामसुंदर महिला मंडळ खालचापाट व वराती प्रसादिक महिला मंडळ खालचापाट संघाने द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत आठ संघानी सहभाग घेतला होता.
शहरातील भंडारी भवन येथे पार पडलेल्या मंगळागौर स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रभागा गॅस एजन्सीच्या सौ. संगीता हळदणकर, लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहिल आरेकर, भंडारी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मानसी शेटे, उपाध्यक्षा सौ. स्वाती कचरेकर, खजिनदार सिद्धी आरेकर, सचिव नेहा वराडकर, सह सचिव साक्षी शेटे, सुजाता बागकर, अरुणा पाटील, मनाली आरेकर, सुजाता चव्हाण, स्मिता धामणस्कर, प्रतीक्षा बागकर आदींसह अन्य महिला उपस्थित होत्या.
या स्पर्धेत वराती प्रसादिक महिला मंडळ खालचापाट, शामसुंदर महिला मंडळ खालचापाट, राम दत्त महिला मंडळ आरे, इंद्रधनू महिला मंडळ श्रृंगारतळी, प्रतिभा कलोपासक महिला मंडळ गुहागर, खिलाडी ग्रुप असगोली, सखी ग्रुप पालशेत, पिंपळादेवी महिला मंडळ ( कै. सौ. माधवी मोहन मोरे यांना समर्पित वरचापाठ) या आठ संघानी सहभाग घेतला होता.
गुहागरसह तालुक्यातील अन्य भागातील महिलांनी मंगळागौर स्पर्धेचा आनंद लुटला. खिलाडी ग्रुपच्या हिमानी धावडे, अदिती धनावडे, आर्वी गोयथळे, सिद्धी घाणेकर, तृप्ती घुमे, विधाता रोहीलकर, पर्णीका रोहिलकर, शुभ्रा साखरकर यांनी सुंदर सादरीकरण केले. तसेच प्रतिभा कलोपासक ग्रुप, गुहागर आणि सखी ग्रुप पालशेत यांनीदेखील चांगले सादरीकरण केले.
या स्पर्धेचे परीक्षण सौ. विणा परांजपे व सौ. अर्पणा नातू यांनी केले. तर सुत्रसंचालन शामल आरेकर व सौ. उज्वला पाटिल यांनी केले.