महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
मंत्री नितेश राणे यांनी घेतले वैभव खेडेकर यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन!

खेड : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे हे सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजीखेड शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी वैभव खेडेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या फुलांच्या पायघड्या घालून सत्कार करण्यात आले. तर घरी शाल श्रीफळ आणि गणेशाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. यावेळी वैभव खेडेकर यांच्या सहकुटुंब भेट घेऊन स्वागत केले.
यावेळी वाशिष्ठी दुग्ध समूहाचे अध्यक्ष प्रशांत यादव, केदार साठे, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह खेड तालुक्यातील नागरिक आणि वैभव खेडेकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.