मधुबन कट्ट्यावर दर महिन्याला ज्येष्ठाना काव्यानंदाची पर्वणी : कवयित्री शोभा जोशी
उरणमध्ये मधुबन कट्ट्यावर कोमसापतर्फे कवी संमेलनाचा उपक्रम
उरण दि १९ (विठ्ठल ममताबादे ) : मधुबन कट्ट्यावर दरमहा १७ तारखेला ऐकायला मिळणारे कविसंमेलन ही काव्य आनंदाची पर्वणी असते. अशा आनंदाचा लाभ ज्येष्ठांना क्वचितच ठिकाणी मिळत असेल.मात्र हा आनंद उरणच्या विमला तलावावर भरणाऱ्या कोमसापच्या मधुबन कट्ट्यावर हमखास मिळतो, असे मत ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.
उरण तालुक्यात विमला तलाव येथे प्रत्येक महिन्यात १७ तारखेला कोकण मराठी साहित्य परिषद व मधुबन कट्टाच्या माध्यमातून कवी संमेलन भरविले जाते. या महिन्यात १७ तारखेला विमला तलाव (गार्डन ) येथे कवी संमेलन भरले होते त्यावेळी जेष्ठ कवियित्री यांनी कवी संमेलन बाबत आपले मत व्यक्त केले.
यावेळी रायगड भूषण प्रा. एल. बी.पाटील, सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम, देवदत्त सूर्यवंशी इ. प्रमुख अतिथी उपस्थित होते.
अशोक जाधव, प्रियांका करपे, मिसेस क्वीन (महाराष्ट्र), कवी प्रा. गजानन चव्हाण,कवी प्रा.चिंतामणी धिंदळे यांना सत्कार करून गौरविण्यात आले. स्वागताध्यक्षपदी प्रा.साहेबराव ओहोळ होते. सूत्रसंचालन संजय
होळकर यांनी सुरेख केले.रंगतदार कवि संमेलनात
मच्छिंद्र म्हात्रे,अनुज शिवकर, रामचंद्र म्हात्रे,हेमंत पाटील,मारुती तांबे,भालचंद्र म्हात्रे, भगवान पोसू,अजय शिवकर,अरूण म्हात्रे संग्राम तोगरे, एन जी.पाटील, अशोक जाधव आदींनी बहारदार कविता सादर केल्या.