महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे मांडवी समुद्रकिनारी वाळू शिल्प साकारून अनोख्या शुभेच्छा!
रत्नागिरी : येथील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर वाळू शिल्पकार श्री. अमित पेडणेकर यांच्या सहकाऱ्यांनी वाळूमध्ये शिल्प तयार करून केक कापत गुरुवारी राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
वाळू शिल्पकार अमित पेडणेकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कमी वेळामध्ये खूप मेहनतीने अमित पेडणेकर मांडवी बीच वरील गेटवे ऑफ रत्नागिरीनजीक वाळूमध्ये कलाकृती तयार केली. ना उदय सामंत यांनी याची दखल घेत आपल्या चाहत्यांकडून या अनोख्या पद्धतीने दिलेल्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि कृतज्ञता व्यक्त केली.