मराठी भाषेला जगभरात पोचवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी : ना. उदय सामंत

रत्नागिरी : मराठी भाषेला जगभरात पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्यांच सांगितले. मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी सातत्यपूर्ण काम करत राहू याकरिता लागणारे सहकार्य आम्ही करणार असल्याचे राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले.

रविवारी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे ‘कीर्तनसंध्या’ कार्यक्रमाला ना. सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. याकार्यक्रमाच्या निमित्ताने आज जी मराठी भाषेला जगभरात पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्यांच त्यांनी सांगितले.
मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी सातत्यपूर्ण काम करत राहू याकरिता लागणारे सहकार्य आम्ही करणार असल्याचं आश्वासन दिलं. कीर्तनसंध्या कार्यक्रम देखील मराठी भाषेचा प्रचार करत असल्याने माझ्या दृष्टीनं हा कार्यक्रम महत्वाचा आहे. यावेळी ह. भ. प. श्री. चारूदत्त आफळे महाराज यांसह मोठ्या संख्येने रत्नागिरीकर उपस्थित होते.