महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणसाहित्य-कला-संस्कृती

मांडकी पालवणमध्ये होणाऱ्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनात सहभागी व्हा : सौ  अंजलीताई चोरगे

चिपळूण (मांडकी पालवण) :कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलन येत्या १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या संचालिका तथा साहित्य संमेलन स्मरणिकेच्या संपादिका सौ. अंजलीताई चोरगे यांनी केले आहे.

साहित्यातून शेती आणि सहकाराचा जागर

मांडकी पालवण येथील संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर हे तीन दिवसीय संमेलन पार पडणार आहे. ग्रामीण संस्कृती, प्रगतशील शेती आणि सहकार चळवळीला साहित्याच्या माध्यमातून एक नवी दिशा देणे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे भूषविणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे लाभले आहेत. संयोजन समितीचे अध्यक्ष पद श्री प्रकाश देशपांडे यांच्याकडे आहे.

सौ. अंजलीताई चोरगे यांचे आवाहन

​संमेलनाच्या तयारीबाबत माहिती देताना सौ. अंजलीताई चोरगे म्हणाल्या,

​”ग्रामीण जीवन आणि कृषी संस्कृती हा महाराष्ट्राचा कणा आहे. या क्षेत्रातील समृद्ध विचारांचा आस्वाद घेण्यासाठी आणि साहित्यिकांशी संवाद साधण्यासाठी हे संमेलन एक उत्तम व्यासपीठ आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील साहित्यप्रेमींनी या वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा.”

संमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • दिनांक: १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६.
  • स्थळ: कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण (ता. चिपळूण).
  • प्रमुख कार्यक्रम: ग्रंथदिंडी, परिसंवाद, ग्रामीण कवी संमेलन, कृषी प्रदर्शनी आणि नामवंत साहित्यिकांच्या मुलाखती.
  • दिग्गज उपस्थिती: संमेलनासाठी ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

नियोजन आणि जय्यत तयारी

​संमेलनाच्या यशस्वितेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. ग्रामीण कथाकथन, ‘आता आत्महत्या थांबवूया’ यासारखे संवेदनशील परिसंवाद आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा हे या संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button