मिरजमधील जैन धर्मीय पंचकल्याणक महा महोत्सवाला आ. शेखर निकम यांची भेट

सांगली: दुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे जैन धर्मीय पंचकल्याणक महामहोत्सव कार्यक्रमास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री शेखर निकम व सौ पूजा निकम यांनी आज भेट देऊन जैन मुनीमहाराजांचे शुभाशीर्वाद घेतले.
या प्रसंगी सकल जैन समाजातर्फे श्री सचिन कोल्हापुरे व सरिता कोल्हापुरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य श्री सुनितकुमार पाटील, सौ वैशाली पाटील, श्री व सौ दीपाराणी नितीन कोल्हापुरे पूजेचे यजमान श्री आप्पासाहेब पाटील,सौ पाटील व हजारो जैन श्रावक श्राविका सभामंडपात हजर होते.
यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे दुधगाव व परिसरातील अनेक माजी विद्यार्थी, संस्थेचे माजी शिक्षक, तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती यांचेसोबत प्राचीन जैन मंदिर तसेच ग्रामदैवत श्री दुधेश्वर मंदिर याचेही दर्शन घेतले.