मोबाईल फोटोग्राफीमध्ये रत्नागिरीच्या फबिहा इम्तियाज शेखची राज्यस्तरासाठी निवड
संगमेश्वर : नेहरू युवा केंद्र रत्नागिरीतर्फे युवा उत्सव २०२२-२३निमित्त मानेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हास्तरीय मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये फिनोलेक्स कॉलेजमध्ये आय. टी. प्रथम वर्षमध्ये शिकणारी कुमारी फबिहा इम्तियाज शेखने प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला आहे.
चित्रकला, हस्तकला, गायन, सिंथेसायझर ,गिटार वादन, बुद्धिबळ, स्विमिंग, स्केटिंग, हॉलीबॉल, वक्तृत्वस्पर्धा यामधील सहभागा बरोबर फबिहाचे स्वतःचे युट्यूब चॅनेल देखील आहे. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा म्हणजे ‘मोबाईल फोटोग्राफीमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाऊन राज्यस्तरावर या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिच्या या उज्वल यशाबद्दल फिनोलेक्स कॉलेजचे प्राचार्य,प्राधापक वर्ग आणि समाजामधून अभिनंदन आणि पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या जात आहेत.