महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयसाहित्य-कला-संस्कृती
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतले नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी बाप्पाचे दर्शन!

पुणे: राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतेच पुण्यात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले.
या भेटीदरम्यान डॉ. उदय सामंत यांनी बाप्पाच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यांच्यासोबत मल्हार पाटेकर आणि प्रसाद पाटेकर हेदेखील उपस्थित होते.
या भेटीमुळे राजकीय आणि कला क्षेत्रातील संबंध अधिक दृढ झाल्याचे दिसून येते.