महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
रत्नागिरीच्या पुरातन श्रीराम मंदिरात पालकमंत्री सामंत यांनी घेतले दर्शन!

रत्नागिरी : श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरीमधील राम आळी येथील पुरातन श्रीराम मंदिरात जाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर मी येथे येऊन दर्शन घेत असतो. प्रभू रामाचा आशीर्वाद माझ्यावर कायम असल्याचे समाधान मला यनिमित्ताने मिळत आहे, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी श्रीराम मंदिर समितीच्यावतीने पालकमंत्री डॉ. सामंत यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी अनेक पदाधिकारी व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.