महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
रत्नागिरीत मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली श्री हनुमानाची महाआरती

रत्नागिरी : हनुमान जयंती दिनाचे औचित्य साधत रत्नागिरीत आलेल्या मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गाडीतळ येथे महाआरती करून श्री हनुमानाला वंदन केले. रत्नागिरीतील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. श्री हनुमानाच्या महाआरतीमुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचेसह गजानन करमरकर, संजय जोशी, प्रवीण जोशी, चंद्रकांत रावुळ, भाई दळी, ॲड. बाबासाहेब परुळेकर, ॲड. भाऊ शेट्ये यांचेसह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.