रत्नागिरीत मराठा हॉल येथे उद्या मोफत योग शिबीर

- जागतिक योगा दिनानिमित्त प्रात्यक्षिक कार्यक्रम
रत्नागिरी : रत्नागिरीतील मराठा भवन माळ नाका येथे शुक्रवार दि. २१ जून रोजी विनामूल्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पतंजली योग पिठाचे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त ज्येष्ठ योग गुरु श्री विरू स्वामी हे योग व प्राणायांबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत. तरी तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरी करांसाठी योग व प्राणायाम याबाबत प्रात्यक्षिकांसह यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दोन तासात किमया: हे योग शिबिर सर्वांसाठी मोफत असून सहभागी होणाऱ्या सर्वांना त्यांचे व्याधीनुसार योग किंवा मार्गदर्शन केले जाईल केवळ दोन तासात एक ते दोन किलो वजन योगाने कसे कमी करावे हे देखील प्रात्यक्षिकाने दाखवण्यात येईल. त्यासाठी शिबिरापूर्वी व शिबिरानंतर वजन करून ते सप्रमाण दाखविले जाईल.
अनेक व्याधींवर उपयुक्त तसेच मधुमेह, रक्तदाब, कंबर दुखी, गुडघेदुखी ,थायराइड व स्त्रियांचे आजार अशा अनेक व्याधींवरती उपयुक्त ठरणारे योगाचे मार्गदर्शनही केले जाईल. तरी या विनामूल्य शिबिराचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन मराठा मंडळ रत्नागिरी चे अध्यक्ष डॉक्टर रमेश चव्हाण व कार्याध्यक्ष श्री. सुनील दत्त तथा आप्पा देसाई यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. चंद्रमोहन देसाई ९७६४७९६६७६, श्री. उपेंद्र सुर्वे ९६३७५१११५२
निरामय योग संस्था ९०२८८९९४१२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.