रत्नागिरीत महागणपतीची प्रतिष्ठापना
- रत्नागिरी गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य मंदिर येथे माघी गणेशोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे यांच्या प्रेरणेतून आणि कुडाळ मालवणचे आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीमध्ये रत्नागिरी गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य मंदिर येथे माघी गणेशोत्सवा निमित्त ‘रत्नागिरीचा महागणपती’ ची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली.
शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीला सकाळी ‘रत्नागिरीचा महागणपती’ ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी योगेश मगदूम आणि सौ. अनघा मगदूम यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली. यावेळी उद्योजक अमित देसाई, मंडळाच्या उपाध्यक्ष अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, खजिनदार अमोल देसाई, सल्लागार मनोज घडशी, सदस्य राहुल भाटकर, निखिल शेट्ये, रामदास शेलटकर, राजेश झगडे, अमृत गोरे, साईनाथ सावंत, रोहित भुजबळराव, सागर सोलकर, अभिलाष कारेकर, शिवाजी कारेकर, प्रणव सुर्वे, श्रीनाथ सावंत, ययाती शिवलकर, अशोक वाडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी संध्याकाळी सायंकाळी ८ ते १० या कालावधीत फुणगुस येथील बुवा गौरव पांचाळ आणि साई प्रासादिक भजन मंडळाचे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर उद्या रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार असून सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत तीर्थप्रसाद आणि महिलांचे हळदीकुंकवाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी श्री सत्यनारायणच्या महापुजेला तसेच श्री दर्शनाला उपस्थित राहावे आणि महिलांनी हळदी कुंकू समारंभात सहभगी व्हावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.