रत्नागिरीत राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ

रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी थाटात पार पडला.
उद्घाटक म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांची उपस्थिती लाभली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी राजकिरण दळी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे उपसंचालक नरेंद्र तायडे तसेच मान्यवर परीक्षक उपस्थित होते.राज्यगीताने उद्घाटन समारंभ सुरू झाला. नंतर मान्यवरांनी नटराज पूजन, दीप प्रज्वलन करून श्रीफळ वाढविला.
सर्व मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.
मान्यवर आणि प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतानंतर ऑनलाईन माध्यमातून मा. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिषजी शेलार साहेबांनी समस्त स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटन समारंभास तसेच बालनाट्य पाहण्यासाठी रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
उद्घाटन समारंभाचे निवेदन समन्वयक नंदू जुवेकर यांनी केले.