रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक गायन

- वंदे मातरम्’ च्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम
रत्नागिरी, दि. ६ : ‘वंदे मातरम्’ या गीतास आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वंदे मातरम् गीताचे सामुहिक गायन झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज वंदे मातरम् या गीताचे सामुहिक गायन झाले.
‘वन्दे मातरं वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयज शीतलाम्
शश्य श्यामलां मातरं वन्दे मातरम्.
सुब्रज्योत्स्ना पुलकित यामिनीम्
पुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीं सुमधुर भाषिनीम्
सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्.
या प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा उपनिंबधक डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्यासह विविध शाखेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.





