महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
रत्नागिरी येथे तालुकास्तरीय इज्तिमा संपन्न

रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे (ग्यारवी शरीफ) सणाचे औचित्य साधून कोकणनगर फैजाने अत्तार येथे तालुकास्तरीय इज्तिमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी नात अमजद अत्तारी, आणि प्रवचन (बयान) अल्ताफ कूरेशी यांनी केले. या प्रसंगी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. इज्तिमानंतर सर्वांना नियाजचे वाटप करण्यात आले.

या वेळी दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे सदस्य अली असगर मुल्ला,मौलाना अल्ताफ कूरेशी अकील मेमन तसेच इतर सदस्य उपस्थित होते.