राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व

- वैधता प्रमाणपत्र सहज आणि वेळेत देण्यासाठी विशेष मोहीम
रत्नागिरी : “राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व’ निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने २६ जून ते ४ जुलै कालावधित विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र सहज आणि वेळेत उपलब्ध करून देणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
विशेषत: व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये सन २०२५-२६ या वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्तांनी केले आहे.
- हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | दादर- सावंतवाडी राज्यराणीला तुतारी एक्सप्रेस का म्हणतात?
- छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!
- पनवेलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण!
सध्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट, सीईटी, क्लॅट व जेईई इ. परीक्षा दिलेल्या आहेत. तसेच त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समिती कार्यालयामध्ये अर्ज दाखल आहे. मात्र, प्रस्तावामध्ये त्रुटी असले कारणास्तव अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी वरील कालावधीमध्ये समिती कार्यालयाशी व्यक्तीशः अथवा पालकांमार्फत संपर्क साधून त्रुटी पूर्तता करण्याबाबत समितीकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे.