रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या यांच्या प्रेरणेतूनस्वयंरोजगारासाठी १६ घरघंट्यांचे मोफत वाटप
कोल्हापूर : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा कोल्हापूर मधील सरोळी ता.आजरा, येथे सामाजिक उपक्रमासह दि.10 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांची सरोळी येथील आकाराम देसाई यांच्या निवासस्थानापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली.
सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमाअंतर्गत गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी१६ घरघंट्यांचे वाटप करण्यात आले
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, माजी जि. प.अध्यक्ष उमेश आपटे लोकमान्य संस्था समूहाचे संस्थापक जनार्दन नेऊगरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना विभागीय पोलीस अधिक्षक रामदास इंगवले यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांचे समाजकार्य व अध्यात्मिक कार्य खूप मोठे आहे, घरघंटी वाटप केल्याने महिलांना त्याचा निश्चित फायदा होईल असे मनोगत व्यक्त केले
रामानंदाचार्य पीठाचे उत्तराधिकारी प.पू कानिफनाथ महाराज यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना युवांनी स्वतःचा रोजगार व नोकरी सांभाळून आजच्या धावत्या युगामध्ये आध्यात्मिक मार्गाने चालावे असे आवाहन केले व भाविकांना शुभाशीर्वाद दिले
उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमासाठी सुमारे दहा हजार भाविक उपस्थित होते
हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समिती चे जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी जिल्हा सहअध्यक्ष मधुकर बाबर जिल्हा सचिव दिलीप कोळी जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली पाटील जिल्हा युवाध्यक्ष अमोल पाटील जिल्हा कर्नल रुपेश सुतार ,यांच्यासह सर्व जिल्हा सेवा समिती मधील माजी व विद्यमान पदाधिकारी सर्व जिल्ह्याचे ज.न.म प्रवचनकार सर्व तालुका सेवा समिती महिला सेना युवासेना संग्राम सेना व आजरा तालुक्याचे अध्यक्ष आकाराम देसाई व त्यांचे सर्व तालुका व सेवा केंद्र पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमासाठी भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टीने करण्यात आली.





