लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघात क्रीडा क्षेत्राला भरीव सहकार्य करणार : आ. किरण सामंत

लांजा: लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी भरीव कार्य करणार असल्याची ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली. लांजा तालुका शारीरिक शिक्षण संघटना आणि तायक्वांडो फिटनेस अकॅडमी, लांजा यांच्या वतीने आयोजित शालेय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. खेळाडूंना प्रोत्साहन देताना ते म्हणाले, “या मतदारसंघात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. विशेषतः तायक्वांडो खेळासाठी लागेल ती सर्व मदत आमदार म्हणून मी नक्कीच करेन.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थित खेळाडू व आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जगदीश राजपकर, मुन्ना खामकर, लल्या कुरूप, बाळा लांजेकर, राहुल शिंदे, सचिन डोंगरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेमुळे तालुक्यातील क्रीडा संस्कृतीला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.