महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजशिक्षणसाहित्य-कला-संस्कृती

लोप पावत चाललेला मराठी भाषेचा ठेवा पुस्तक रूपात जतन

  • चिपळूण नगर परिषद व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणचा उपक्रम

चिपळूण : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेतील लोप पावत चाललेले शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, लोकगीते यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा व चिपळूण नगर परिषद व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या सहयोगाने स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त २ अंकी नाटक ‘सागर प्राण तळमळला’ या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून संबोधित केले.

यावेळी चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही ना. उदय सामंत यांनी दिली. तसेच उद्योगमंत्री म्हणून चिपळूणच्या विकासात योगदान देण्याचे काम यापुढे अविरत चालू राहिल, असा विश्वास सर्वांना दिला.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी  मराठी बोलूनच राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक परदेशामधून आणली हे ठामपणे सांगितल. तसेच मराठीचा आग्रह हा सर्वांनीच धरावा असे आवाहन केले.

यावेळी चिपळूणच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाबद्दल त्यांचे त्यांनी कौतुक केले. हे प्रेरणादायी पुस्तक आहे आणि हा राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना आदर्श निर्माण केला आहे, असे ते म्हणाले.

यावेळी चिपळूणचे आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच चिपळूणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button