जगाच्या पाठीवरमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयराष्ट्रीयशिक्षणसायन्स & टेक्नॉलॉजीसाहित्य-कला-संस्कृती

‘वेव्हज्’मुळे मुंबईसह महाराष्ट्र जागतिक पातळीवर झळकणार !

  • राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : वेव्हज् २०२५ समिटचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते उद्घाटन; वेव्हज् मुळे मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक पातळीवर झळकेल, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025 अर्थात ‘वेव्हज्-२०२५’ या भव्य उपक्रमाचं उद्घाटन मुंबईतल्या वांद्रे इथल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे दि.१ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय रेल्वे तथा माहिती प्रसार मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

समिटमध्ये उभारण्यात आलेल्या मॅजिकल महाराष्ट्र या दालनाला आज भेट दिली. यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त पी.अनबालागन उपस्थित होते. या समिटमुळे मुंबईसह महाराष्ट्र जागतिक पातळीवर झळकणार असल्याचा विश्वास  व्यक्त केला.

मुंबईसह महाराष्ट्राला जागतिक पातळीवर नेण्याच्या उद्देशाने वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025 आयोजन करण्यात आले आहे. १ ते ४ मे २०२५ पर्यंत चालणाऱ्या या समिटमध्ये जगभरातील मंत्री दर्जाचे ३५ ते ४० मान्यवर, विविध कंपन्यांचे १२० ते १५० मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भारतातील उद्योजक मुकेश अंबानी, अनिल अंबानी, गौतम अदानी, महिंद्रा आणि टाटा समूहाचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.     

चित्रपटसृष्टीसाठी आज ऐतिहासिक दिवस
यावर्षीचा महाराष्ट्र दिन हा चित्रपट सृष्टीसाठी ऐतिहासिक दिवस आहे. चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे, याचेही सूतोवाच व्हेव समिटमध्ये होईल, असा विश्वास यावेळी ना. सामंत व्यक्त केला.

मराठी चित्रपटसृष्टीलाही उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. चित्रपट निर्माते, कलाकार यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे मराठी चित्रपट क्षेत्रातील लहान-मोठ्या सगळ्यांनाच ताकद मिळणार आहे.

टॉलीवूड पासून ते बॉलीवूडपर्यंतचे सर्व नामवंत कलावंत, चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांसह मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतही या समिटमध्ये सहभागी होणार आहेत.

लक्षवेधी दालने

पर्यटन, उद्योग क्षेत्राबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील युट्युब, नेटफ्लिक्स, एमेझॉन या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या सगळ्यांची दालने समिटमध्ये असतील. या सर्व कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार असल्याची माहितीही दिली. याशिवाय भारत, तेलंगाणा आणि महाराष्ट्र यांचीही दालने उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील दालनामध्ये दादासाहेब फाळकेंपासूनचा चित्रपटसृष्टीचा इतिहास दाखविण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांचा विकास करतांना म्हाडा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सिडको यासारख्या संस्थांनी आपल्या कामातून केलेली क्रांती दाखविण्यात आली आहे. मुंबईतला अटल सेतू, सी-लिंक, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकल्पांचाही समावेश सादरीकरणामध्ये करण्यात आला आहे. ही समिट महाराष्ट्राला जागतिक पातळीवर एका मोठ्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वासही नामदार सामंत यांनी व्यक्त केला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button