शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी : शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे MBBS चे विद्यार्थ्यांनी बुधवारी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी केली.
शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी
व विद्यार्थीनी यांनी यावेळी ढोलवादन,पोवाडा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढाया, तह,अफजल खान वध यासारखे प्रसंग नाटकाद्वारे सादर केले.
त्यानंतर शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता
डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सर्व विद्यार्थी यांचे कौतुक केले व आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ.रामानंद, सर्व प्राध्यापक, कर्मचारी,विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.