महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळी जन्मोत्सवाला भेट भावस्पर्शी

- श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या दर्शनावेळी नामदार उदय सामंत यांचे उदगार
आळंदी : श्री क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सव कार्यक्रमाला राज्याच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. या पावन प्रसंगी ना. सामंत यांनी त्यांच्या समाधीस्थळी जाऊन भक्तिभावाने दर्शन घेत पूजन केले.
ज्ञानयोगाचे महान प्रतीक असलेल्या या संतांच्या पवित्र कार्याची आठवण करून देणारा हा क्षण अत्यंत भावस्पर्शी ठरला, असे नामदार उदय सामंत यांनी समाधीस्थळाच्या दर्शनानंतर बोलताना सांगितले.