श्री देव रघुवीर देवस्थान देवरुख येथे ३० मार्चंपासून श्रीराम नवमी उत्सव

देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूख वरची आळी येथिल पुरातन रघुपती मंदिर येथे गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शु. प्रतिपदा शके १९४७ रविवार दिनांक ३० मार्च २०२५ ते चैत्र शु. दशमी सोमवार दि. ७ एप्रिल २०२५ या दरम्यान श्रीराम नवमी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
गुढी पाडवा – रविवार दि. ३० मार्च २०२५ सकाळी ९.०० वा.
गुढी उभारणे आणि श्रीराम षोडशोपचार पूजा. श्री राम उत्सवमूर्ती आगमन.
रात्री ९.०० ते ११:३० वा.
सिद्धिविनायक महिला मंडळ, वरची आळी, देवरुख श्रीराम रसिकवृंद भजन मंडळ वरची आळी देवरुख पालखी, भोवत्या (छबीना) आरती, मंत्रपुष्प आणि प्रसाद
शनिवार दि. ०५ एप्रिल २०२५ सायंकाळी ०५:३० वा.
कीर्तन सेवा – ह. भ. प. सौ. अमृता नवाथे – शहाणे, रत्नागिरी
रविवार दि. ०६ एप्रिल २०२५
श्री राम जन्म सोहोळा कीर्तन आणि सुंठवडा प्रसाद श्री राम पालखी प्रदक्षिणा.
प्रदक्षिणा मार्ग – श्री देव रघुवीर देवस्थान, रामेश्वर मंदिर, माणिक चौक, विठ्ठल मंदिर, कै. लक्ष्मीबाई राजवाडे चौक, मधली आळी पार, श्री गणेश वेदपाठ शाळा, देसाई पार मार्गे परत श्री देव रघुवीर देवस्थान महापूजा व वसंत पूजा
उत्सवादरम्यान सोयीनुसार षोडशोपचार पूजा, पावमान मंत्राभिषेक आचार्य अवधूत साठे गुरुजी यांच्या करवी होईल.
ह. भ. प. सौ. अमृता नवाथे – शहाणे, रत्नागिरी याचे लळीत कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल
तरी सर्व रामभक्तांनी या उत्सवादरम्यान आप्तेष्ट मंडळीसह उपस्थित राहून श्री राम भक्तीचा आनंद घ्यावा ही विनंती असे आवाहन .
विश्वस्त श्री राम आळी मित्र मंडळ, राम आळी, देवरुख यांनी केले आहे