महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक आरास!
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील सुप्रसिद्ध मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त सोमवारी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुलांची ही आरास भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
सोमवारी संकष्टी चतुर्थी दिनी महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून भाविकांनी गणपतीपुळे येथे उपस्थित राहून समुद्रकिनारी वसलेल्या मंदिरातील श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.
संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून मंदिरात मुख्य पुजारी श्री अभिजीत घनवटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगीबेरंगी फुलांची छान आरास केली होती.