महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
संगमेश्वर तालुक्यातील श्री मार्लेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा

देवरुख : श्री मार्लेश्वर देवस्थान, आंगवली चॅरिटेबल ट्रस्टच्या श्री मार्लेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार तसेच कलशारोहण सोहळ्यास शनिवारी उत्साहात पार पडला. राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा कलशारोहण सोहळा पार पडला.

यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खा. विनायक राऊत, आ. शेखर निकम, मा. आ. सदानंद चव्हाण, रवींद्र माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख महेश म्हाप आदी उपस्थित होते.
