शिवसेना लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्या मातोश्री अमिता देसाई यांचे निधन

लांजा : शिवसेना लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई व सौ. प्रणिता बोडस यांची आई श्रीमती अमिता राजेश देसाई (वय ८०) यांचे शनिवार दि. 6 जुलै रोजी रात्री 11:15 रोजी दुःखद निधन निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज रविवारी सकाळी 09:30 वाजता त्यांचे एस्. टी. स्टँड समोरील राहत्या घरून निघणार आहे प्रसिद्ध गुरुप्रसाद स्वीट मार्ट उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. बुंदी लाडू, जिलेबी आदी गोड पदार्थ बनवण्यात अमिता देसाई यांचा हातखंडा होता. त्या प्रेमळ मनमिळाऊ आणि परोपकारी होत्या.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मुलगा गुरुप्रसाद याला पाठिंबा देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मुलगी प्रणिता ही लांजा नगर पंचायतीची माजी नगरसेविका आहे. त्यांच्या मागे मुलगा सुना नातवंडे आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी गुरूप्रसाद देसाई यांचे सांत्वन केले.