सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट येथे ‘विज्ञानाचा अद्भुत प्रवास’ या विषयावर व्याख्यान
संगमेश्वर : कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय प्रत्येकवेळी नविन- नविन शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना कशी मिळेल, या साठी प्रयत्नशील असते. शैक्षणिक ज्ञानाबरोबर आजच्या नवीन पिढीतील कला विद्यार्थ्यांना विज्ञानाची देखील जोड पाहिजे.यासाठी कला महाविद्यालयात नुकतेच विनीत वाघे (सेवा साधना प्रतिष्ठान -केतकी चिपळूण ) यांचे व्याख्यान ठेवण्यात आले.
कला आणि विज्ञान यांमध्ये काय संबंध तसेच थॉमस एडिसन, आयझॅक न्यूटन, आईन्स्टाईन यांचे शोध प्रोटॉन, न्यूट्रॉन,फोटॉन,लाईट तसेच ब्रम्हांड, तारमंडळ, आकाशगंगा , ए.आय. यासंबंधीचे सर्व विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न दूर केले.दुपारनंतरच्या सत्रात विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करून या विषयावर चर्चासत्र झाले. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील विज्ञाना संबंधीचे अनेक प्रश्नांचे निरसन होवून त्याचा वापर कलेत कसा करता येईल यासंबंधी काही नवीन कल्पना सापडल्या.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
या व्याख्याना प्रसंगी जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, प्राचार्य. माणिक यादव, प्राद्यापक वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.