सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
संगमेश्वर : सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे येथे २१ जुलै रोजी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मानवी जीवनातील गुरुचे स्थान लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्व्लन करून करण्यात आली.या प्रसंगी कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव तसेच सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.
या वेळी प्राचार्य माणिक यादव यांनी आपल्या भाषणातून गुरूंचे महत्व सांगितले.प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरु हा त्यची आई असते. त्यानंतर विविध गुरु त्याच्या आयुष्यात येतात. शिक्षकांच्या आणि पालकांनी केलेल्या संस्कारांमुळे माणूस घडतो. विद्यार्थ्याच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तितकाच शिक्षकांचा देखील असतो. तसेच सर्व प्राध्यापकांनी गुरुविषयी असणारी आत्मीयता व आदर आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
गुरूंना वंदन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.