पनवेल-रत्नागिरी रात्री धावणार समर स्पेशल गाडी

रत्नागिरी : समर स्पेशल अनारक्षित गाड्यांपैकी पनवेल ते रत्नागिरी अशी धावणारी साप्ताहिक विशेष गाडी आज शुक्रवारी (दि. १९ मे ) रोजी रात्री रत्नागिरीसाठी सुटणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील समर स्पेशल गाड्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरणार आहेत.
खेड चिपळूण रत्नागिरीकडे येणाऱ्या प्रवाशांना होणार लाभ
खेड, चिपळूण, रत्नागिरीकडे येणाऱ्या प्रवाशांनी या गाडीने प्रवास करून लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन प्रवासी संघटनांमार्फत करण्यात आले आहे.
पनवेल-रत्नागिरी समर स्पेशल स्थानकांवर थांबणार

गाडी क्र. 01134 पनवेल – रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक) एक्सप्रेस गाडीच्या फेऱ्या दिनांक ५ मे पासून सुरू झाले आहेत. उर्वरित फेऱ्यांच्या माहितीनुसार दि.19/05/2023 आणि 26/05/2023 रोजी म्हणजे शुक्रवारी 21:30 वाजता सुटून ती दुसऱ्या दिवशी 04:30 वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहोचणार आहे.
या स्थानकांवर थांबणार समर स्पेशल गाडी
ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर या स्थानकावर थांबे घेऊन रत्नागिरीला तिचा प्रवास संपणार आहे.