स्वा. वि. दा. सावरकर यांनी वास्तव्य केलेल्या शिरगावच्या निवासस्थानाची शतकपूर्ती
रत्नागिरी : रत्नागिरीत येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या वास्तव्याला १०० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे वास्तव्य असलेले कै. विष्णूपंत दामले यांच्या निवासस्थानी राज्याचे माजी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या सावरकरांच्या वस्तूंसंदर्भातील माहिती घेतली.
स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा रत्नागिरी वास्तव्याला होते तेव्हा पसरलेल्या प्लेगच्या साथीपासून वाचण्यासाठी ते रत्नागिरी शहरात जवळच असलेल्या दिवंगत विष्णुपंत दामले यांच्या घरी राहिले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या निवासस्थानाची शिरगावच्या दामले कुटुंबियांनी जपणूक केली आहे.
रत्नागिरीचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी या निवासस्थानाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून तेथे भेट दिली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरकालीन तेथील आठवणींना उजाळा दिला.